esakal | तरूणाचा अनोखा विक्रम; सोळा वेळेस रक्तदान आणि आता प्लाझ्मा दान

बोलून बातमी शोधा

baburao bhosure
तरूणाचा अनोखा विक्रम; सोळा वेळेस रक्तदान आणि आता प्लाझ्मा दान
sakal_logo
By
प्रा. नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : धानोरे (ता. शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्ते बाबूराव बाळासाहेब भोसूरे यांनी दोन नागरिकांना प्लाझ्मा दान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. याविषयी भोसूरे यांनी "१९ एप्रिल रोजी कोणाला जीवनदान मिळत असेल तर मी प्लाझ्मा दान करण्यासाठी इच्छुक आहे. B+ प्लाझ्मा कोणाला लागत असेल तर सांगा अशी पोष्ट सोशल मिडियावर टाकली होती." त्यानंतर पुणे, नाशिक, सातारा, नगर या ठिकाणांहून तब्बल २०० च्या वर कॉल करून प्लाझ्माची मागणी झाली. मंगळवारी (ता. २०) क्षणाचाही विचार न करता कोणतीही ओळख नसताना दोन रुग्णांना प्लाझ्मा दान केला. गजानन सोमनाथ मट्टे (वय ३२, रा. ससाणेनगर, हडपसर ता. हवेली जि. पुणे) हे श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल उरुळी कांचन आणि सुदर्शना किशोर साळुंखे (वय ३२, रा. वडकी ता. हवेली) हे शतायु हॉस्पिटल केशवनगर मुंडवा या दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्रत्येकी २०० मिली प्लाझ्मा दान केला.

हेही वाचा: प्लाझ्मा तुटवडा रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांना एफडीएचे आदेश

कोरोना महामारीच्या काळात रुग्णाला प्लाझ्माची खुप गरज भासत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन ऑक्सिजन, बेड याच्या तुटवड्यामुळे काही रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. भोसूरे कोरोनावर मात करून सुखरूप घरी आले आहेत. कोरोनामधून बरे होऊन २८ दिवस पूर्ण झाले असतील तर स्वतःहून प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. भोसूरे यांनी आतापर्यंत तब्बल १६ वेळा रक्तदान व एकदा प्लाझ्मा दान केला आहे. या पुढेही असेच कार्य सुरु ठेवणार असून, आणखी एक महिन्यानंतर पुन्हा प्लाझ्मा दान करणार असल्याचे भोसूरे यांनी सांगितले. रक्तदान, पेटलेस व प्लाझ्मा दान यापेक्षा सर्व श्रेष्ठदान कोणतेच नाही असे मत भोसूरे यांनी व्यक्त केले आहे. प्लाझ्मासाठी ९७६७८९१७११ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. प्लाझ्मा कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तींचा २८ दिवसानंतर काढून तो कोरोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या व्यक्तीला दिला जातो.

हेही वाचा: जुन्नर तालुक्यात ऑक्सिजन सिलेंडरची तीव्र टंचाई