esakal | स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचा मैत्रिणीने केला खून
sakal

बोलून बातमी शोधा

PUNE

स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचा मैत्रिणीने केला खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत असलेल्या एका तरुणाचा मैत्रिणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी त्याच्या मैत्रिणी विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनल पुरुषोत्तम दाभाडे (वय ३४, सध्या रा. हिंद कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याची मैत्रीण रोहिणी रामदास युनाते (वय २४) हिला अटक करण्यात आली. दाभाडेचा भाऊ निवास दाभाडे (वय ३०, रा. घोटा, जि. अमरावती) यांनी याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनल आणि रोहिणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. गेल्या तीन वर्षांपासून दोघेजण एकत्र राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होत होते. २९ ऑगस्ट रोजी दोघांची भांडणे झाली. त्यामुळे रोहिणीने सोनलला ढकलले. त्यामुळे डोके भिंतीवर आपटल्याने सोनल बेशुद्ध झाला होता. त्यानंतर रोहिणीने सोनलचा गळा आवळून खून केला.

दरम्यान, रोहिणीने पोलिसांना सोनल घरात घसरून पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला, अशी माहिती दिली. त्यामुळे या प्रकरणी सुरवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. मात्र दाभाडेच्या नातेवाइकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. शवविच्छेदन अहवाल आणि तपासात मिळालेल्या माहितीनुसार तिने सोनलचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.

loading image
go to top