भोरचे राजे आबाराजे (चिंतामणराव) पंतसचीव यांचे निधन

विजय जाधव
Monday, 22 February 2021

भोर संस्थांनचे राजे आबाराजे (चितामणराव) सदाशिवराव पंतसचीव (वय ८६) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. भोर संस्थानचे ते १३ वे वंशज होते. त्यांच्यामागे पत्नी उर्मिलादेवी, मुलगे राजेशराजे, दीपकराजे व योगेशराजे हे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

भोर - भोर संस्थांनचे राजे आबाराजे (चितामणराव) सदाशिवराव पंतसचीव (वय ८६) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. भोर संस्थानचे ते १३ वे वंशज होते. त्यांच्यामागे पत्नी उर्मिलादेवी, मुलगे राजेशराजे, दीपकराजे व योगेशराजे हे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांना क्रिकेट आणि टेनिस खेळाची विशेष आवड होती. १९५६ साली ते पुणे विद्यापीठाच्या क्रिकेट टीमचे कर्णधार होते. वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत ते टेनिसच्या स्पर्धांमध्ये भाग घेत होते. त्यांना फिरण्याचीही विशेष आवड असल्याने त्यांनी जगभरातील अनेक देशांना भेटी दिल्या होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोरमधील सर्वात जुन्या समजल्या जाणा-या भोर एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष होते. आबाराजेंचे आजोबा राजा रघुनाथराव यांनी भोरमध्ये सुरु केलेल्या रामनवमी महोत्सवाचा वडिलांच्या काळात काही वर्षे पडलेला खंड १९७८ साली त्यांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सर्व भोरवासीयांना राजवाड्यात महाप्रसाद दिला जायचा. मनमिळावू स्वभावाचे असलेले आबाराजे पंतसचीव यांना भोरवासीयांविषयी मोठा आदर होता.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aabaraje Pantsachiv Passed Away