
महावितरण विभागाने वीज दरवाढ मागे घ्यावी, राज्य सरकार चा 16 टक्के अधिभार आणि वहन कर रद्द करन्यात यावा आदी मागण्यांसाठी आम आदमी पार्टीकडून गुरुवारी पुणे-सातारा रस्ता येथील पद्मावती येथील महावितरण कार्यालया समोर टाळे ठोको आंदोलन करण्यात आले.
धनकवडी : कोविड दरम्यानच्या मार्च ते जून या चार महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफीची घोषणा सरकारने करावी, महावितरण विभागाने वीज दरवाढ मागे घ्यावी, राज्य सरकारचा 16 टक्के अधिभार आणि वहन कर रद्द करण्यात यावा आदी मागण्यांसाठी आम आदमी पार्टीकडून गुरुवारी पुणे-सातारा रस्ता येथील पद्मावती येथील महावितरण कार्यालया समोर टाळे ठोको आंदोलन करण्यात आले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राज्यातील नागरिकांचे कोविड दरम्यानच्या चार महिन्याचे २०० युनिट पर्यंत विज बिल माफी व वीज दर वाढ मागे घेवून ३०% दर कपातीचे आश्वासन पूर्ण करण्याचे निर्णय घेण्यात यावेत यासाठी आम आदमी पार्टी कडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात निवेदन दिले होते, क्रांती दिवसाला पालकमंत्र्यांच्या घराला घेराव केला, राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी जेल भरो केले परंतु गार निद्रेत असलेले ठाकरे सरकार आजवर जागे झालेले नाही.
दोन दिवस घेण्यात येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात याबाबत जनहितार्थ निर्णय घेण्याची विनंती आम आदमी पार्टी कडून करण्यात आली होती.
संपूर्ण देशात आपल्या राज्यातजास्त भावाने वीज वसुली बंद करून आता तरी राज्यातील जनतेची लुट बंद करावी, आणि निवडणुकीपूर्वी दिलेले ३०० युनिट वीज वापर करणाऱ्यांना ३०% स्वस्त वीज द्यावी यासाठी आम आदमी पार्टी कडून राज्यव्यापी टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनाचा भाग म्हणून आम आदमी पार्टी, पुणे तर्फे महावितरणच्या पद्मावती वीज कार्यालयासमोर आंदोलन केले.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संयोजक मुकुंद किर्दत आणि सहसंयोजक संदीप सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली टाळे ठोको आंदोलन केले. यावेळी मालन कारंडे, चेतन बेंद्रे, सुभाष कारंडे, महेश स्वामी, सावन राऊत, प्रणित तावरे, लक्ष्मण बडे, राज चकाने, शशिकांत शेलार,आदित्य कोंब,ओमकार शिंदे, सतीश यादव,गीता पोटे,नीता दरेकर, कविता गरड, शामराव जिंदे, मोहनसिंग राजपूत, एस एम अली, मनोज थोरात, विठ्ठल चोपडे, वायकुळे, मंगेशकुमार हिरे आदी उपस्थित होते.