Bharat ke Mahaveer: पुण्याचा रिक्षावाला दिसणार 'डिस्कव्हरी'वर; लॉकडाउनमध्ये स्थलांतरितांना केली होती मदत!

Pune_Auto_Driver_Akshay_Kothawale
Pune_Auto_Driver_Akshay_Kothawale

पुणे : कोरोनाच्या काळात लग्नासाठी साठविलेल्या पैशातून स्थलांतरित कामगारांना मदत करणारे पुण्यातील रिक्षाचालक अक्षय कोठावळे
यांच्या नावाची नोंद 'भारत के महावीर'मध्ये झाली आहे. 

कोरोनाच्या काळात गरजू लोकांच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या देशातील 12 कर्तबगार व्यक्तींमध्ये कोठावळे यांचा समावेश करण्यात आला आहे. युनायटेड नेशन्स इंडिया आणि नीती आयोगाने डिस्कव्हरी चॅनेलच्या भागीदारीतून सुरू केलेल्या 'भारत के महावीर' या तीन भागांच्या मालिकेच्या माध्यमातून ही निवड करण्यात आली आहे. 

लॉकडाउनच्या काळात कोठावळे यांनी रोज 400 श्रमिक कामगारांना जेवण आणि आश्रय उपलब्ध करून दिला. तसेच गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्तींना रुग्णालयात नेण्यासाठी मोफत रिक्षा सेवाही उपलब्ध करून दिली होती. यासाठी त्यांनी स्वतःच्या लग्नासाठी जमवलेले दोन लाख रुपये खर्च केले. त्यांचे काम पाहून समाजातील दानशुरांकडून त्यांना सहा लाख रुपये देणगी मिळाली असून, या निधीचा वापर ते जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोचण्यासाठी करत आहेत.

अक्षय यांच्या वडिलांचे 18 मे रोजी रात्री हृदयविकाराने निधन झाले. तेही रिक्षाचालक होते. वडिलांच्या निधनाचे दुःख असतानाही त्यांनी लॉकडाउनमध्ये जेवण वाटपाचे काम अखंडपणे सुरूच ठेवले होते.

आपल्या कामाबाबत कोठावळे म्हणाले, "हा प्रत्येकासाठीच बिकट काळ आहे. माणूस म्हणून गरज असलेल्या इतरांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. बहुसंख्य लोक आपल्या घरी जाऊ शकत नव्हते आणि शहरात राहण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. तेव्हा या स्थलांतरित श्रमिकांसाठी मदतीचा हात म्हणून पुढाकार घेतला.'' 

कोठावळे यांची ऑटो रिक्षा असे वाहन बनले, ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले. अशा प्रकारच्या मदत कार्यासाठी व्यक्तीकडे धाडस असले पाहिजे. कारण एका व्यक्तीच्या प्रयत्नामुळे अनेक गोष्टी बदलू शकतात.
-सोनू सूद, अभिनेता

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com