
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जलजीवन मिशन नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत ४५ गावांसाठी एकूण ४५.०५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली.
पारगाव - आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जल जीवन मिशन नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत सन २०१२-२२ व सन २०२२-२३ मध्ये एकूण ४५ गावांसाठी एकूण ४५.०५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली. असल्याची माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या अन्वये रक्कम रुपये अन्वये पाच कोटी पर्यंत दरडोई खर्चाच्या निकषात बसणाऱ्या स्वतंत्र्य व प्रादेशिक योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
मंजूर योजना गावांची नावे पुढील प्रमाणे कंसात मंजूर अंदाजपत्र रक्कम लाखात
आंबेगाव तालुका - नारोडी (१०७.४), नारोडी (११८.७५), शिगवे(२७३.२२), गंगापूर खुर्द (१४.६६), आडिवरे (१२.३६), चपटेवाडी (३०.६५), साकोरे (८३.३७), भराडी( १५९.९४), चिंचोली – कोकणे (५०.५७), भागडी (७०.८७), गिरवली – रामवाडी(३६.४), गिरवली (१२५.२२), कोलदरे- गोनवडी (९६.११), डिंभे खुर्द (३४.७२), कुशिरे बुद्रुक (११.९), कानसे – वरेवस्ती (२४.८), आंबेगाव गावठाण (१००.९२), कळंबई(६२.०९), धोंडमाळ- शिंदेवाडी(१७५), महाळुंगे तर्फे घोडा (२५.२४), टाकेवाडी(१४८.२९), पोंदेवाडी(१०९.४१), ठाकरवाडी - महाळुंगे(६५.६२), वाळुंजवाडी (८९.९७), शिरदाळे(३८.६२), शिनोली (१७४.४४), माळवाडी –महाळुंगे (१०६.६९), खडकवाडी (१९१.४३), अवसरी - वायाळमळा(९८.५५), मेंगडेवाडी(१०६.९९), टाव्हरेवाडी(९५.७), अवसरी –शिंदेमळा(१४७.०८), चांडोली खुर्द (८५.१२), पहाडदरा(९९.७९), जवळे (१९४.७४), गावडेवाडी(१२०.५८), तांबडेमळा(१८०.९४), पिंगळेवाडी – लांडेवाडी(१३६), रानमळा(१०१.२), वाळुंजनगर (८४.६६), ठाकरवाडी (१७१.७८), गंगापूर बुद्रुक (१९९.८२)
शिरूर तालुका – गणेगाव खालसा (४५७.४६), बाभुळसर खुर्द (४९९.९९), निमगाव भोगी (१९६.७१)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.