esakal | आंबील ओढ्यालगत असणाऱ्या कॅल्व्हटचे (पूलाचे) काम कधी होणार? नागरिकांचा प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

Aambil Odha Work

आंबील ओढ्यालगत असणाऱ्या कॅल्व्हटचे (पूलाचे) काम कधी होणार? नागरिकांचा प्रश्न

sakal_logo
By
अजित घस्ते

सहकारनगर - आंबील ओढ्यालगत (Aambil Odha) असणाऱ्या अरण्येश्वर मंदिर समोरील मुख्य रस्त्यावरील कॅल्व्हटचे काम (Culvert Work) चार महिन्यापासून सुरू असल्याने स्थानिक नागरिकांना या मुख्य रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाल्याने गेले चार महिने त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांना सहकारनगर, पर्वती, तळजाई टेकडी, शिंदे हायस्कूल, सारंग कडे जाण्यासाठी या मुख्य रस्त्याचा वापर करण्यात येत होता. (Aambil Odha Bridge Work Issue)

मात्र, अनेक दिवसांपासून काम रखडल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार वर्ग यांना दोन किलोमीटर लांबून जावे लागत आहे. नागरिकांना वाहतूकीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरीकांना  ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यामुळे अरण्येश्वर मंदिर समोरील व मित्र मंडळ पर्वती येथील कॅल्व्हटचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक नागरिक वारंवार करीत आहेत. यावेळी योगेश डांगी, सुमित ननावरे, गणेश सावळे, संतोष वाडघरे, रोहन भोसले, रुपेश तुरे, दत्ता टिकेकर इ. मागणी केली आहे.

हेही वाचा: पर्यटकांचा मोर्चा पुन्हा लोणावळ्याकडे

यावेळी कौशिक साबळे (यशतारा सोसायटी, अरण्येश्वर) म्हणाले, अरण्येश्वर मंदिर समोरील चार महिने पासून काम सुरू असून अर्धवट कामामुळे लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. पाऊस आला की येथील रहिवाशांना भीती वाटते. मागील पावसात घराचे मोठे नुकसान होऊन चार दिवस घरातील गाळ, चिखल काढण्यात गेले. सोळा टॉली चिखल काढण्यात आला. यामुळे रात्रीच्या वेळी घरात पाणी शिरेल या भीतीने घरा बाहेर थांबावे लागते. येथील काम लवकर पूर्ण करावे, याठिकाणी वारंवार प्रशासनाकडे अर्ज केला आहे. यावेळी अश्विनी कदम (नगरसेविका) म्हणाल्या, अरण्येश्वर मंदिर समोरील कॅल्व्हटचे साडेचार महिने काम सुरू आहे. काम संतगतीने सुरू असून स्थानिक नागरिकांना ये-जा करण्यासाठी लांबून जावे लागत आहे. तसेच, 24 मीटर नाल्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. मात्र याठिकाणी 11 मीटरच नाल्याचे रुंदीकरण केल्याने पाण्याचा प्रवाहाला अडथळा ठरला जाणार आहे. यामुळे नाल्याची आणखीन रुंदीकरण करावे याबाबत ही आयुक्तांना निवेदन दिले आहे. अरण्येश्वर मंदिर समोरील व मित्र मंडळ पर्वती येथील दोन्ही कॅल्व्हटचे (पुलाचे) काम पूर्ण करावे यासाठी आयुक्तांकडे मागणी केली आहे.

यावेळी अतुल कडू (कनिष्ठ अभियंता, मनपा पथ विभाग) म्हणाले, अरण्येश्वर मंदिर समोरील व पर्वती मित्र मंडळ येथील पुलावरील कॅल्व्हटचे काम चालू आहे. त्यामुळे रस्ता येण्या जाण्याकरिता व वाहतूकीसाठी बंद करण्यात आला असून रस्त्यावरील कॅल्व्हटचे काम पूर्ण होण्यास आणखीन काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी ही काम पूर्ण होईपर्यन्त सहकार्य करावे. मनपा प्रशासनाच्या माध्यमातून काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

loading image
go to top