esakal | झोपडपट्टीतील नागरिकांना रोजगार मिळण्यासाठी 'आमदानी' अॅप
sakal

बोलून बातमी शोधा

play store

झोपडपट्टीतील नागरिकांसाठी विशेषतः महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणारे अॅप विकसित केले आहे.

झोपडपट्टीतील नागरिकांना रोजगार मिळण्यासाठी 'आमदानी' अॅप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे- लॉकडाऊन काळात अनेकांना रोजगार मिळणे थांबले आहे. रोजंदारीवर अवलंबून असलेल्या झोपडपट्टीमधील कामगारांना याचा मोठा फटका बसत आहे.त्यांची ही समस्या सोडवण्यासाठी आनंद ललवाणी यांनी एक अनोखी कल्पना मांडत झोपडपट्टीतील नागरिकांसाठी विशेषतः महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणारे अॅप विकसित केले आहे. आमदानी (Aamdani) असे या अप्लिकेशनचे नाव आहे. आनंद यांनी त्यांचे दोन मित्र ईशान अग्रवाल व आदित्य रंजन यांनी मिळून अॅप विकसित केले आहे. केवळ मुलभूत शिक्षण घेतलेले कामगार देखील या अॅपवर नोंदणी करून रोजगार मिळवू शकतात. 

आनंद यांनी अॅपबाबत सांगितले की, अॅपवरून काम मिळविण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली असावी. उच्च माध्यमिक शिक्षण आणि इंग्रजीचे मुलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्यांना कामानुसार दर आठवड्याला पगार दिला जातो. अॅपमध्ये एक व्हिडीओ असून त्यातून काम कसे करावे, याचे प्रशिक्षण मिळते. तर सध्या पुणे, मुंबईतील झोपडपट्टी भागातील तीन हजार कामगार या अॅपवरून काम मिळवत असून 100 हून अधिक प्रकल्पांवर ते काम करत आहेत, असे ईशान यांनी सांगितले.

हे वाचा - पदविका अभ्यासक्रमाला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; वाचा सविस्तर

आमचे ग्राहक अमेरिकेतील औद्यागिक क्षेत्रातील आहेत. सुरुवात करण्यासाठी स्टँफोर्डच्या संशोधन प्रयोगशाळांच्या 50 कंपन्या सहाय्यक आहेत. पुढील तीन वर्षांत सुमारे दोन लाख महिला कामगारांना अॅपचा लाभ मिळावा, असा आमचा उद्देश आहे.
आदित्य रंजन

असे आहे कामाचे स्वरूप : 
या अॅपद्वारा डेटा लेबलिंग करणे, वर्गीकरणासाठी चित्र वापरणे, मोबाइल-आधारित भाष्य आणि बाउंडिंग बॉक्स अशा लेबलिंगसाठी उपलब्ध गोष्टी दाखबून त्यांना लेबलिंग करणे अशी कामे उपलब्ध होतील. यात वेगवेगळ्या लोकांना एकाच वेळी लेबलिंग करत असताना यंत्रणा समान प्रतिमा दाखवते. त्यामुळे कामात एकसूत्रता येऊन वेगवेगळ्या गोष्टींसाठी अनेक लोक काम करत असतानाही कामाच्या अंतिम टप्प्यात येणार परिणाम हा समान असतो.


 

loading image
go to top