esakal | बारामतीच्या कृषी प्रदर्शनाचा आमिरलाही आवरला नाही मोह... 
sakal

बोलून बातमी शोधा

Untitled-2.gif

अभिनेता आमिर खानची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या कृषी प्रदर्शनानिमित्त आमिर खान बारातीत आल्याने बारामतीकरांमध्ये एक उत्साहाचे वातावरण दिसत आहे, आमिर खानला पाहण्यासाठी यावेळी मोठी गर्दी झाली होती.

बारामतीच्या कृषी प्रदर्शनाचा आमिरलाही आवरला नाही मोह... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती : अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या बहुचर्चित कृषिक 2020 चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले. यावेळी  माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच अभिनेते आमिर खान देखील यावेळी उपस्थित आहेत

यावेळी अभिनेता आमिर खानची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या कृषी प्रदर्शनानिमित्त आमिर खान बारातीत आल्याने बारामतीकरांमध्ये एक उत्साहाचे वातावरण दिसत आहे, आमिर खानला पाहण्यासाठी यावेळी मोठी गर्दी झाली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आमिर खान हा अशा कार्यक्रमांना नेहमीच हजेरी लावत असतोे. परंतू आज त्याच्या अचानक झालेल्या आगमनामुळे सर्वांनाच आनंदाचा धक्का बसला. तसेच यावेळी इलेक्ट्रीक गाडीमधून आमिर खानने प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी त्याच्या इलेक्ट्रीक गाडीचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथ्य केले. 

उद्धव ठाकरे तुमच्या नेत्यांना आवरा नाहीतर... : मराठा क्रांती मोर्चा

यावेळी मुख्यमंत्र्यांनीही या इलेक्ट्रीक गाडीतून फेरफटाका मारत प्रदर्शनाची माहिती घेतली. या इलेक्ट्रीक गाड्यांची या प्रदर्शनात मोठी चर्चा होती. बारामतीत दाखल झालेल्या अनेक नेत्यांनी या इलेक्ट्रीक गाड्यांमधून सैर केली. यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामतीत आले असताना त्यांनी देखील या गाडीमधून सैर केली होती. व येथील कृषी विकासाबाबत माहिती घेतली होती.  

दरम्यान, कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबवित असलेले आधुनिक तंत्रज्ञान, शेती व शेतीपूरक व्यवसायाची निगडित सर्व विषयावरची माहिती उपस्थित मान्यवरांना अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली. नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनात सरकारचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटकनाशके, कृषी अवजारे व यंत्रे, प्रक्रिया उद्योग, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस तंत्रज्ञानातील कंपन्या सहभागी झाल्या आहेत.  कृषी प्रदर्शनाचे हे पाचवे वर्षे आहे. १९ जानेवारीपर्यंच चालणाऱ्या या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image