
बालगंधर्वच्या पुनर्विसकासाविरोधात ‘आप’चे आंदोलन
पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाच्या विरोधात आम आदमी पक्षाने आज (ता. ९) बालगंधर्व रंगमंदिर चौकात आंदोलन केले. रंगमंदिराच्या पुनर्विकासाची प्रक्रिया पुणेकरांना अंधारात ठेवून राबविली जात असून, चार वर्षानंतर अचानक प्रशासक आल्यानंतरच हा प्रस्ताव पुढे का आणला असा प्रश्न ‘आप’ने उपस्थित केला आहे. बालगंधर्व रंगमंदिर हा पुण्याचा सांस्कृतिक ठेवा आहे. पण पालकमंत्री अजित पवार आणि प्रशासक विक्रमकुमार यांनी हा ठेवा नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
२०१८ ला राष्ट्रवादी काँग्रेसने हे नाट्यगृह पाडण्यास विरोध केला होता, पण आता प्रशासकांना हाताशी धरून हा निर्णय घेतला. पुनर्विकासाच्या नावाखाली महानगरपालिकेच्या इतर नाट्यगृहांचा यापूर्वीच खेळखंडोबा झालेला आहे. त्यात परत आता बालगंधर्वचा पुनर्विकास केला जाणार आहे. बालगंधर्व पाडण्याची मागमी कोणी केली होती याची माहिती कलाकार, रसिकांना नाही. ही माहिती सार्वजनिक केली पाहिजे. सर्व प्रक्रिया पथदर्शकच झाली पाहिजे. तसेच नागरिकांना आणि कलाकारांची विश्वासात घेऊन पुढील वाटचाल निश्चीत करावी अशी मागणी ‘आप’चे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केली. प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Web Title: Aap Agitation Against Redevelopment Of Bal Gandharva Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..