शिवराज्याभिषेक दिनासंबंधी भाजप नेत्याचे आक्षेपार्ह ट्विट; पुण्यात पोलिसांत तक्रार दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

काही महिन्यांपूर्वी भाजप नेते आणि तत्कालीन दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' हे पुस्तक प्रकाशित केले गेले होते.

पुणे : दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनासंबंधी आक्षेपार्ह ट्वीट केले. याप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी संबंधिताविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 

- स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; परिस्थिती जाणून घ्या एका क्लिकवर

भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी गुरुवारी रात्री शिवराज्याभिषेक दिनासंबंधी एक ट्वीट केले. त्यामध्ये शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देत या दिवसाला 'हिंदू साम्राज्य दिवस' घोषित करून शुभेच्छा दिल्या.

- परीक्षा रद्दचा निर्णय कायम ठेवा; मुख्यमंत्र्यांकडे कोणी केली ही मागणी!

काही महिन्यांपूर्वी भाजप नेते आणि तत्कालीन दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' हे पुस्तक प्रकाशित केले गेले होते. त्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचया इतिहासाची मोडतोड करण्याचा कुटील डाव दिल्लीतून सातत्याने रचला जात असल्याचे शिंदे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

- शिवरायांच्या स्वराज्याचा एक मुख्य शिलेदार तोरणा ऊर्फ प्रचंडगड

शिंदे यांनी गुप्ता यांच्याविरुद्ध ऑनलाइन तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर कडक कारवाई व करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आपतर्फे शुक्रवारी दिवसभर भाजप नेत्याविरुद्ध एक हॅशटॅग वापरून चांगलाच समाचार घेण्यात आला, अशी माहिती मुकुंद किर्दत यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AAP lodges complaint in Pune police over Delhi BJP state presidents offensive tweet