
गेल्या काही महिन्यांपासून ‘आप’तर्फे प्रभाग पातळीवर कोपरा सभा, गृहभेटी, तिरंगा यात्रा याद्वारे नागरिकांशी संपर्क साधण्यात येत आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत ‘आप’ सर्व जागा लढवणार
पुणे - पंजाब विधानसभेतील (Punjab Vidhansabha) दणदणीत विजयानंतर आम आदमी पक्षाच्या (Aap Party) कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले असतानाच आता विजय कुंभार यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्ष (आप) पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये (Pune Municipal Election) सर्व जागा लढविण्यासाठी सज्ज आहे, अशी माहिती पक्षाचे राज्य प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून ‘आप’तर्फे प्रभाग पातळीवर कोपरा सभा, गृहभेटी, तिरंगा यात्रा याद्वारे नागरिकांशी संपर्क साधण्यात येत आहे. येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये विकासाचे दिल्ली मॉडेल सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवून ‘संधी द्या, सुविधा घ्या’ हा नारा देत नागरिकांना साद घालण्याचे ठरविण्यात आल्याचेही डॉ. मोरे यांनी सांगितले.
Web Title: Aap Party Will Contest All Seats In Pune Municipal Corporation Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..