

AAP Releases First Candidate List for Pune Civic Polls
Sakal
पुणे : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने (आप) पुणे शहरासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आप पुणे शहर समितीने महापालिका निवडणूक २०२५-२६ साठी २५ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. यावेळी ‘आप’चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका प्रलंबित होत्या. सत्तेसाठी प्रस्थापित पक्षांमध्ये युती, तोडफोड आणि राजकीय खेळी सुरू आहे.