कुंजीरवाडीतून मुलीला पळवले; अपहरणाचा गुन्हा

कुंजीरवाडीतून मुलीला पळवले; अपहरणाचा गुन्हा
Published on

लोणी काळभोर, ता. २२ : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील बाजारतळ परिसरातून एका १५ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची उत्तर प्रदेशातील असून तिचे वडील कुंजीरवाडीतील एका नर्सरीमध्ये मजूर म्हणून काम करतात. मंगळवारी (ता. १६) रात्री नऊच्या सुमारास बाजारतळ परिसरातून ही मुलगी अचानक बेपत्ता झाली. अज्ञात व्यक्तीने मुलीच्या अल्पवयाचा फायदा घेऊन तिला पालकांच्या संमतीशिवाय फूस लावून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने गुन्हा नोंदवून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश पैठणे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com