सत्ता डोक्यात गेल्यानेच अशी विधाने- रोहित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar

अब्दुल सत्तार साहेब आपण सत्तेत आहात, सत्ता ही कोणाच्याही डोक्यात गेली नाही पाहिजे, आम्ही भारतीय संस्कृती जोपासणारे लोक आहोत.

सत्ता डोक्यात गेल्यानेच अशी विधाने- रोहित पवार

बारामती - अब्दुल सत्तार साहेब आपण सत्तेत आहात, सत्ता ही कोणाच्याही डोक्यात गेली नाही पाहिजे, आम्ही भारतीय संस्कृती जोपासणारे लोक आहोत, आम्ही आता शांत आहोत, पण तुम्ही कोणत्याही पातळीवर जाल आणि आम्ही असेच शांत राहू, असे नाही, कोणत्या तरी पक्षाचा बदला घेण्याच्या हेतूनेच हे सरकार काम करत आहे, अशी घणाघाती टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

अब्दुल सत्तार यांच्या विधानाचा समाचार घेताना त्यांनी आम्ही शांत राहणार नाही असाच इशारा दिला. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या विरोधात बोलण्याची जणू शर्यतच लागली आहे, असे दिसते. राज्यात शेतकरी अडचणीत आहेत, ओल्या दुष्काळाचा निर्णय घेणे गरजेचे असताना निर्णय होत नाही, अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत, शेतकरी अडचणीत आहे पण सरकार राजकारण करण्यात गुंग असल्याची टीका रोहित पवार यांनी केली.

सामान्य माणूस अडचणीत आहेत, मात्र राणा विरुध्द बच्चू कडू असा सामना पाहायला मिळतोय, लोकांच्या हिताचे निर्णय सरकारने घ्यायला हवेत.