बारामती - परिस्थिती प्रतिकूल असली तरी जिद्द, कष्ट करण्याची तयारी व सचोटी या त्रिसूत्रीमुळे स्वप्नवत यश अशक्य नसते ही बाब बारामतीच्या अभिजित रामदास चौधर यांनी सिध्द करुन दाखविली आहे. .बारामतीनजिक रुई येथील एका शेतकरी कुटुंबातील अभिजित यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पाच वेळा अपयश येऊनही जिद्द सोडली नाही, अखेर सहाव्या प्रयत्नात देशात 487 वा क्रमांक प्राप्त करत त्यांनी यशस्वी उमेदवारांच्या यादीत आपले स्थान निश्चित केले. येत्या वर्षभरात आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती होणार आहे..घरामध्ये शैक्षणिक पार्श्वभूमी नसता, आई वडील दोघेही फारसे शिकलेले नसतानाही अभिजितने शिकून मोठ व्हाव, या एकाच अपेक्षेने वडील रामदास चौधर यांनी त्याला शिकण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले. शेतीसोबतच अनेक कष्टाची कामे करुन मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी आर्थिक तजवीज केली..बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा व विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बारावीपर्यंत व त्या नंतर शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आहे.अभिजित यांचे सातत्य वाखाणण्याजोगे होते. मुलाखत व लेखी परिक्षा यांची सांगड बसत नसल्याने 2016 ते 2025 अशी नऊ वर्षे त्यांनी कमालीचा संघर्ष केला. सातत्याने येणा-या अपयशाने अनेकदा निराशाही आली पण एक दोन गुणांमुळे हुकणारी संधी पाहून त्यांनी पुन्हा नव्या जिददीने अभ्यास केला, त्याला नऊ वर्षांच्या तपश्चर्येनंतर यश प्राप्त झाले..घरच्या परिस्थितीची जाणीव असलेल्या अभिजित यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली, कष्ट केले. पाच वेळा त्यांना मुख्य परिक्षेत यशही प्राप्त झाले, मात्र मुलाखतीत एक दोन गुणांनी त्यांना अपयश आले. सातत्याने अपयश आल्यानंतरही त्यांनी जिद्द कायम ठेवत पुन्हा पुन्हा प्रयत्न केले, अखेर त्यांची निवड झाली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.