पुणेकरांनो, कोरोनाला घाबरू नका; दिलासा देणारी बातमी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

-कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 75 टक्‍क्‍यांवर 
-पुणे विभागातील स्थिती, दोन लाख 58 हजार 182 रुग्ण कोरोनामुक्‍त. तरीही काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन. 

पुणे : पुणे विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन लाख 43 हजारांवर पोचली असून, त्यापैकी दोन लाख 58 हजार 182 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 75 हजार 987 इतकी आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, कोरोना बाधित आठ हजार 925 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के आहे. तसेच, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 75.25 टक्के असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे विभागात बुधवार (ता. 16) अखेर 15 लाख 13 हजार 870 नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी तीन लाख 43 हजार 94 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये कालच्या तुलनेत सहा हजार 699 ने वाढ झाली आहे. पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा बाधित रुग्णांच्या संख्येत दुसऱ्या स्थानावर आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या प्रत्येकी 25 हजारांवर पोचली आहे. पुणे जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के असून, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 79.87 टक्के इतके आहे. हे चित्र दिलासादायक असले तरी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

पुणे विभागातील जिल्हानिहाय स्थिती : 

पुणे जिल्हा : 
कोरोना बाधित रुग्ण - 2 लाख 31 हजार 196 
बरे झालेले रुग्ण - 1 लाख 84 हजार 649 
ऍक्‍टिव रुग्ण - 41 हजार 366 
मृत्यू - 5 हजार 181 
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सातारा जिल्हा : 
कोरोना बाधित रुग्ण - 25 हजार 476 
बरे झालेले रुग्ण - 16 हजार 524 
ऍक्‍टिव रुग्ण - 8 हजार 227 
मृत्यू - 725 

सोलापूर जिल्हा : 
कोरोना बाधित रुग्ण - 25 हजार 929 
बरे झालेले रुग्ण - 17 हजार 965 
ऍक्‍टिव रुग्ण - 6 हजार 999 
मृत्यू - 965 

सांगली जिल्हा 
कोरोना बाधित रुग्ण - 24 हजार 788 
बरे झालेले रुग्ण - 14 हजार 762 
ऍक्‍टिव रुग्ण - 9 हजार 95 
मृत्यू - 931 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोल्हापूर जिल्हा 
कोरोना बाधित रुग्ण - 35 हजार 705 
बरे झालेले रुग्ण - 24 हजार 282 
ऍक्‍टिव रुग्ण - 10 हजार 300 
मृत्यू - 1 हजार 123 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: About 75% of patients recover from corona infection