माझ्या पत्नीशी संबंध ठेवू नको, नाहीतर....

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

पुणे : २९ सप्टेंबरला विशाल व बालाजी यांच्यात सासवड रस्त्यावरील रोहित वाईन्सच्या दुकानासमोर भांडणे झाली होती. दोघेही दारू प्यायले होते. विशाल याचे बालाजीच्या पत्नीसोबत अनैतीक संबध होते. ''माझ्या पत्नीशी संबध ठेवू नको, नाहीतर तुझा काटा काढीन,'' अशी धमकी बालाजीने विशाल याला भांडणात दिली होती. त्यानंतर २९ सप्टेंबरपासून बालाजी देखील फरार होता. 

हडपसर : पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गोव्यातून पतीला अटक केली आहे. विशाल रमेश ओव्हाळ (वय २५, रा. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बालाजी पखाले (वय. २९ रा. वडकीगाव, ता. हवेली, जि. पुणे) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी विशालचे वडील रमेश सखाराम ओव्हाळ (वय ४२, रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. 

हडपसर पोलिसठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रघूनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबरला विशाल सकाळी कामावर जातो म्हणून, घरातून निघून गेला होता. तो घरी परत न आल्याने दुसऱ्या दिवशी तो मिसिंग असल्याची तक्रार त्याच्या वडीलांनी दिली होती. त्यानुसार तपास सुरू असताना विशालचा मित्र महेश पेठे यांनी विशालच्या वडिलांना सांगितले की, २९ सप्टेंबरला विशाल व बालाजी यांच्यात सासवड रस्त्यावरील रोहित वाईन्सच्या दुकानासमोर भांडणे झाली होती. दोघेही दारू प्यायले होते. विशाल याचे बालाजीच्या पत्नीसोबत अनैतीक संबध होते. ''माझ्या पत्नीशी संबध ठेवू नको, नाहीतर तुझा काटा काढीन,'' अशी धमकी बालाजीने विशाल याला भांडणात दिली होती. त्यानंतर २९ सप्टेंबरपासून बालाजी देखील फरार होता. 

२९ सप्टेंबरला दोघेही दारू पिऊन गाडीवर दोघेही १५ नंबर येथील कालव्याकडेला गेले. तेथे थांबल्यावर बालाजी याने लाकडी दांडक्याने विशाल याच्या डोक्यावर मारहाण केली. या घटनेत विशालचा मृत्यू झाला. त्यानंतर बालाजीने विशालचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. तसेच विशालची गाडी देखील कालव्यात फेकून दिली व पूरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 
पोलिस तपास पथकात सहाय्यक पोलिस निरिक्षक संजय चव्हाण, राजू वेंगरे, नितीन मुंडे, शाहिद शेख, अकबर शेख, प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे, सैदोबा भोजराव यांचा समावेश होता. अद्याप विशाल याचा मृतदेह मिळाला नसून त्याची गाडी कालव्यात पोलिसांना सापडली आहे. पोलिस विशाल याचा मृतदेह शोधण्याचे काम करीत आहेत 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Absconding husband arrested in Goa for murdering wife's boyfriend