त्याने पोलिसांनाच 'रॉ' एजंट असल्याचे सांगितले अन्....

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

पुणे : केंद्र सरकारच्या रिसर्च अॅन्ड ऍनलिसीस विंग (रॉ) या तपास संस्थेचा 'एजंट'  असल्याची बतावणी करणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी बिहारमधील त्याच्या गावी चौकशी केल्यानंतर एका व्यक्तीचा खुन करुन तो फरारी झाल्याचे उघड झाले. 

खतरनाक खिलाडी 2 पाहिला, कारचा झाला मोह अन् जिगरी मित्रालाच संपविले
 

पुणे : केंद्र सरकारच्या रिसर्च अॅन्ड ऍनलिसीस विंग (रॉ) या तपास संस्थेचा 'एजंट'  असल्याची बतावणी करणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी बिहारमधील त्याच्या गावी चौकशी केल्यानंतर एका व्यक्तीचा खुन करुन तो फरारी झाल्याचे उघड झाले. 

खतरनाक खिलाडी 2 पाहिला, कारचा झाला मोह अन् जिगरी मित्रालाच संपविले
 

सोनु सुरज तिवारी (वय 26, रा.कासमा, रफिगंज, औरंगाबाद, बिहार. सध्या रा.लक्ष्मीनगर, कोंढवा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पोलिस कर्मचारी अमोल फडतरे यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फडतरे हे नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी दोन वाजता कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये त्यांचे दैनंदिन काम करीत होते. त्यावेळी पोलिस ठाण्याच्या आवारात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्यास विचारणा केली. त्यावेळी त्याने 'आपण अतिरीक्त पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी आहोत, सध्या 'रॉ'चा एजंट म्हणून काम करत आहे.' असे फिर्यादी यांना सांगितले. पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. त्याच्याकडे अधिक विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, पोलिसांनी इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांचे कोणी अधिकारी कोंढवा परिसरात आल्याची खात्री केली. मात्र, त्यांनी तपास संस्थांचा कोणीही अधिकारी पुण्यात आला नसल्याचे पोलिसांना सांगितले. 

पुणे : नाचताना लागला धक्का म्हणून विद्यार्थ्यास जबर मारहाण

दरम्यान, पोलिसांनी त्याच्या बिहारमधील रफीगंज या गावच्या पोलिसांशी संपर्क साधला. त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी सोनु तिवारी याने तेथे एका व्यक्तीचा खुन केला होता. तेव्हापासून तो फरारी असल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली. त्यावेळी तो बिहारमध्ये खुन करुन आल्यानंतर पुणे स्टेशन येथे एक-दिड महिना राहिला. त्यानंतर कोंढवा येथे एका ओळखीच्या महिलेकडे तो राहत होता. स्थानिक नागरीकांमध्ये आपली पोलिसांमध्ये किती ओळख आहे, हे दाखविण्यासाठी त्याने हा प्रकार केला. त्यादृष्टीने त्याच्याकडे पोलिस व लष्करी वेशातील काही छायाचित्रे आढळली आहेत.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Absconding Murderers from Bihar arrested in pune while Pretending as Raw Agent