esakal | अल्पवयीन मुलांना शिविगाळ करुन दांडक्याने मारहाण; अ‍ॅट्रॉसिटीचा गु्न्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाण

अल्पवयीन मुलांना शिविगाळ करुन दांडक्याने मारहाण; अ‍ॅट्रॉसिटीचा गु्न्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुन्नर :(दत्ता म्हसकर) मित्राला ये टकल्या,.... इकडे ये... अशी हाक मारली असता, आपल्याच टकल्या म्हणल्याच्या गैरसमजुतीने अल्पवयीन मुलांना लाकडी दांडक्याने मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध विविध कलमासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.

गोळेगाव ता.जुन्नर जवळील लेण्याद्री येथील वाडीत सोमवार ता.११ रोजी ही घटना घडली. याबाबतची फिर्याद मुलांचे वडील अनंता भिका काळे यांनी मंगळवार ता.१२ रोजी दिली. पोलिसांनी गणेश किसन लोखंडे, सौरभ गणेश लोखंडे व राहुल गणेश लोखंडे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: महाविद्यालये सुरू होण्याची तारीख ठरली, असे असतील नियम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनंता काळे यांचा मुलगा व वाडीमधील काही मुले टेकडीवर मोबाईलवर गेम खेळत होती. यावेळी काळे यांच्या मुलाने त्याच्या मित्रास ये टकल्या, इकडे ये असा आवाज दिला. लोखंडे यांनी देखील टक्कल केले असल्याने आपल्यालाच टकल्या म्हणाला असे समजून त्यांनी या मुलांना जातीवाचक बोलून लाकडी दांडक्याने, लाथाबुक्याने मारहाण केली तसेच शिवीगाळ दमदाटी करून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

या प्रकरणी संबंधितावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करावा यासाठी आदिवासी संघटना आग्रही होत्या. पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता.उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे पुढील तपास करत आहेत.

जिल्हाधिकारी यांचा जमाव बंदीचा आदेश डावलून मंगळवार ता.१२ वा सांयकाळी जुन्नर पोलीस ठाण्याचे समोर जमाव जमवून रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याची फिर्याद सहायक फौजदार अनिल चिंधु लोहकरे यानी दिली. त्यानुसार डॉ. विनोद केदारी रा. बारव,संतोष मेंगाळ रा आंबेगव्हान,किशोर भालेकर रा. कुसुर, सुनिल चंद्रकांत पारधी,विश्वास चंद्रकांत पारधी,सोमनाथ पांडुरंग काळे, मनोहर दत्तत्रय केदार व इतर सर्व रा लेण्याद्री ता जुन्नर यांचे विरुद्ध भारतीय दंड विधान कलम १८८ व २६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

loading image
go to top