
पुणे : शहराच्या प्रवेशद्वारासह पुणे स्टेशन परिसरात मॉल, मल्टीप्लेक्सप्रमाणे नागरिकांना चांगले व स्वच्छ स्वच्छतागृह उपलब्ध व्हावीत यासाठी वातानुकूलित (एसी) स्वच्छतागृह महापालिका उभारणार आहे. या प्रत्येक स्वच्छतागृहासाठी महापालिका तब्बल ४ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च करणार आहे. मात्र, हे स्वच्छतागृह उभारल्यानंतर ते दुर्गंधीयुक्त आणि स्वच्छ ठेवण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर असणार आहे.