esakal | पुणे : टाऊन प्लॅनिंगमधील 'या' बड्या अधिकाऱ्याच्या घरी 'एसीबी'ची रेड
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : टाऊन प्लॅनिंगमधील 'या' बड्या अधिकाऱ्याच्या घरी 'एसीबी'ची रेड

- हनुमंत नाझीरकर यांच्याकडे दोन वर्षांत सापडली 2 कोटी 75 लाखांपेक्षा जास्त रक्कम

पुणे : टाऊन प्लॅनिंगमधील 'या' बड्या अधिकाऱ्याच्या घरी 'एसीबी'ची रेड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्याच्या नगर रचना (टाऊन प्लॅनिंग) विभागातील नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी सकाळी पुण्यातील अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबत 'एसीबी'चे अधीक्षक राजेश बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. मात्र, तपशील नंतर सांगतो, असे सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नाझीरकर हे सध्या अमरावती येथे नियुक्तीस आहेत. 2 वर्षांत त्यांच्याकडे सुमारे 2 कोटी 75 लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे अलंकार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. नाझीरकर यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारीवरून एसीबी अनेक दिवस चौकशी करीत होती. त्यानुसार प्राथमिक तपासात तथ्य आढळल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे. पुढे अजून तपास सुरू राहणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुण्यातील कोथरूड येथील स्वप्नशिल्प सोसायटीमधील सदनिकेत  4 पोलिस अधिकारी आणि 8 कर्मचाऱ्यांचे पथक   सध्या झडती घेत आहे. नाझीरकर यांच्या अन्य ठिकाणच्या मालमत्तांचाही शोध सुरू असून तेथेही तपास होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

loading image
go to top