ACB Traps Police Constable in Pune for Accepting Bribe
Sakal
पुणे : वॉरंटची बजावणी करण्यासाठी पाच हजारांची लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. मंगळवारी (ता. २५) दुपारी बाराच्या सुमारास वाघोली पोलिस ठाण्याच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार परमेश्वर माणिक पाखरे (वय ३७) असे कारवाई करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. ते शहर पोलिस दलातील वाघोली पोलिस ठाण्यात कर्तव्यास आहेत. तक्रारदार महिलेने पतीविरोधात २०१५ मध्ये पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता.