काँंग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या गाडीला अपघात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 November 2019

अपघातात विश्वजीत कदम यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत. पुण्यात त्यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे : काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्या गाडीला बुधवारी रात्री मोठा अपघात झाला, पण, सुदैवाने या अपघातातून ते बचावले आहेत.

भाजपचं ठरलं! शिवसेनेशिवाय करणार सत्तास्थापनेचा दावा 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात विश्वजीत कदम यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत. पुण्यात त्यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही.  कराडला जात असताना हा अपघात  झाल्याचे समोर येत आहे. एअरबॅग्जमुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

शिवसेनेचं आज ठरणार; शिवसेनेच्या 'वाघां'ची मातोश्रीवर बैठक

विश्वजीत कदम हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. ते बुधवारी मुंबईत पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते. तेथून ते पुण्यातील निवासस्थानी आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident on Congress MLA Vishwajeet Kadam vehicle in Pune