रस्त्याचे काम करणाऱ्या वाहनाने पादचाऱ्यास चिरडले; एकाचा जागीच मृत्यू | Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

रस्त्याचे काम करणाऱ्या वाहनाने पादचाऱ्यास चिरडले; एकाचा जागीच मृत्यू

किरकटवाडी : कामावरून घरी चालत येत असताना रस्त्याच्या कामात सपाटीकरण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अजस्त्र वाहनाने मागून येऊन चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू (Accident Death) झाला तर एक जण थोडक्यात वाचला आहे. पुणे-पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत व्यंकटेश्वरा कंपनीजवळ ही दुर्दैवी घटना घडली असून मुत्तुराम स्वामी (वय अंदाचे 27 वर्ष रा. गोऱ्हे बुद्रुक ता. हवेली) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Pune Accident One Death)

हवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेजण कामावरून घरी गोऱ्हे बुद्रुक च्या दिशेने चालत येत होते. अचानक मागून वेगात आलेल्या रस्ता सपाटीकरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अजस्त्र वाहनाने एकाला चिरडले त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा व्यक्ती थोडक्यात वाचला आहे. घटना घडल्यानंतर संबंधित चालक ते वाहन आडबाजूला लावून पसार झाला आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा: मरवडे विषबाधा प्रकरण : दोन आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी

याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, सहाय्यक फौजदार प्रदीप नांदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. चालकावर बेदरकारपणे वाहन चालवून पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे हे याबाबत अधिक तपास करत आहेत.

" अपघातानंतर चालक वाहन आडबाजूला लावून पसार झाला आहे. वाहनाची ओळख पटली असून वाहन खुप मोठे असल्याने ते पोलीस ठाण्याकडे न आणता जागेवरच ठेवले आहे. फरार चालकाची ओळख पटवून लवकरच त्याला अटक केली जाईल." सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newsaccidentdeath
loading image
go to top