रात्रीत खोदला शिवरस्ता; चार वर्षांच्या मुलासह चौघे थोडक्यात बचावले

निलेश बोरुडे
Wednesday, 3 March 2021


सकाळी नेहमीप्रमाणे दिलीप पवार व त्यांचा मुलगा दुध घेऊन जात असताना अरुंद रस्ता व खड्ड्यामुळे  त्यांचे वाहन उलटून अपघात झाला. यामध्ये दिलीप पवार यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले असून सुमारे 250 लिटर दूध सांडले.

किरकटवाडी(पुणे): रात्रीच्या वेळी खानापूर-मणेरवाडी(ता. हवेली) शिवरस्ता (दोन गावांच्यामधील रस्ता) जमीन मालक अनंता तुकाराम शेडे यांनी खोदून ठेवल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे.  सकाळी दुध घेऊन जाणारे शेतकरी दिलीप पवार (रा. खानापूर) यांचे चारचाकी वाहन उलटून मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पवार यांच्या चार वर्षांच्या नातवासह चौघेजण थोडक्यात बचावले आहेत. खानापूर, मणेरवाडी येथील पानंद रस्त्यांचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.

खानापूर-मणेरवाडी शिवरस्त्याला लागून अनंता शेडे यांची जमीन आहे. त्यांनी (ता.1 मार्च)  जमीन नांगरताना शिवरस्त्याचा मोठा भागही नांगरला. सुमारे पंचवीस घरे, दोन पोल्ट्री व्यावसायिक व जनावरांचे गोठे असणाऱ्या शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. रस्ता खोदल्यामुळे एका बाजूला खोल खड्डा झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळी नेहमीप्रमाणे दिलीप पवार व त्यांचा मुलगा दुध घेऊन जात असताना अरुंद रस्ता व खड्ड्यामुळे  त्यांचे वाहन उलटून अपघात झाला. यामध्ये दिलीप पवार यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले असून सुमारे 250 लिटर दूध सांडले. गाडीमध्ये पवार यांचा चार वर्षांचा नातूही होता. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

"बाहेरील लोक जमिनी खरेदी करून स्थानिक शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. गावात अनेक ठिकाणी पानंद रस्त्याच्या समस्या आहेत. याबाबत तहसीलदारांकडे पत्रव्यवहार करणार आहे.रस्ते अडवणारांवर कारवाई व्हावी."
- निलेश जावळकर, माजी सरपंच, खानापूर

"खडकवासला मंडलाधिकारी विकास पाटील यांना याबाबत योग्य निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित ठिकाणी जाऊन मंडलाधिकारी रस्ता खुला करून देतील."
- सुनिल कोळी, तहसीलदार, हवेली.

रास्ता पेठेत इमारतीला भीषण आग; 3 फ्लॅट्स व 2 दुकानं भस्मसात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident due to Digging the road at Khanpur mnerwadi Boundary Pune City