
पुणे-सोलापूर महामार्गावर भांडगाव (ता. दौंड) येथे टँकरने मोटारीला धडल्याने चार वाहनांचा शुक्रवारी दुपारी विचित्र अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. सर्वाधिक नुकसान झालेल्या होंडा सिटी मोटारीतील एअरबॅग उघडल्याने चालक बचावला.
केडगाव (पुणे) ः पुणे-सोलापूर महामार्गावर भांडगाव (ता. दौंड) येथे टँकरने मोटारीला धडल्याने चार वाहनांचा शुक्रवारी दुपारी विचित्र अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. सर्वाधिक नुकसान झालेल्या होंडा सिटी मोटारीतील एअरबॅग उघडल्याने चालक बचावला.
...तर आमचा पायगुण वाईट आहे म्हणू नका ; अजित पवार यांची टोलेबाजी
महामार्गावर भांडगाव येथे लेन मार्किंगचे काम चालू असल्याने एक लेन बंद करण्यात येऊन एकाच लेनमधून वाहतूक चालू होती. भांडगावातील गतीरोधकामुळे वाहने सावकाश व थांबत थांबत पुढे सरकत होती. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास गतीरोधकाजवळ तीन मोटारी उभ्या असताना गॅस टँकरने (KA01AG6951) एका होंडा सिटी मोटारीला (MH04FF1060) पाठीमागून जोराची धडक दिली.
वेगाने धडक दिल्याने होंडासीटीसह पुढील तीनही मोटारी एकमेकांवर आदळल्या. अपघातांनंतर टँकर चालक पळून गेला. तीन मोटारीत एकूण दहा ते बारा प्रवासी होते. यात महिलांची संख्या जास्त असल्याने अपघातानंतर त्यांनी मोठा आक्रोश केला. होंडा सिटी व मारूती मोटारीचे दोन्ही बाजूने नुकसान झाले आहे.
म्हाडाच्या ५६४७ सदनिकांची आज Online सोडत; कोणाचं गृहस्वप्न होणार साकार?
याबाबत होंडा सिटीचालक विष्णूप्रासद मिश्रा म्हणाले, टँकर वेगात होता. सिटबेल्ट लावल्याने एअरबॅग उघडल्या गेल्या व मी बचावलो. मोटारीला जोराची धडक बसल्याने दरवाजे उघडत नव्हते. ग्रामस्थांनी मला काचा फोडून बाहेर काढले. महामार्ग पोलिसांनी वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. यवत पोलिस पुढील तपास करीत आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)