दुचाकी व ट्रकच्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू; ट्रकचालक फरार | Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident Death

दुचाकी व ट्रकच्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू; ट्रकचालक फरार

हडपसर : दुचाकीला ट्रकचा धक्का लागून झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू (Women Death In Accident) झाला. अंकिता अतुल कुलकर्णी (वय ३९, रा. ड्रीम व्हिला सोसायटी, काळेपडळ, हडपसर) असे अपघातात प्राण गेलेल्या महिलेचे नाव आहे. पुणे-सासवड रस्त्यावर तुकाईदर्शन चौकात सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला आहे. (Pune Hadapsar Accident News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकिता कुलकर्णी या आज सकाळी आपली मुलगी अनन्या हिला कोचिंग क्लासला सोडण्यासाठी गोंधळेनगरला घेऊन जात होत्या. सासवड रस्त्यावरील तुकाईदर्शन चौकातील शनिमंदिराजवळ त्या वळण घेत असताना त्यांच्या दुचाकीला सासवडकडून येणाऱ्या ट्रकचा धक्का लागला.

हेही वाचा: माझ्या नादी लागल्यास करीन ३०२; तरुणीचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

त्यामुळे त्या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक जावून त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ट्रकचालक ट्रक बाजूला उभा करून पळून गेला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फरार ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newsaccidentdeath
loading image
go to top