

Funeral Trip Ends in Accident at Varandha Ghat; 11 Sustain Injuries
sakal
हिर्डोशी: वरंधा घाटमार्गे अंत्यविधीसाठी महाडकडे जाणाऱ्या टेम्पोला शिरगाव (ता. भोर) हद्दीत रविवारी (ता. २९) सकाळी अपघात झाला. मातीवरून चाके घसरल्याने टेम्पो रस्त्याशेजारील खड्ड्यात गेला. यात ११ जण जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.