मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला. ही घटना आज (शनिवार) पहाटे अडीचच्या सुमारास घडली. कंटेनर व इनोव्हा कार यांच्यात धडक झाल्याने ही घटना घडली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली इनोव्हा गाडी ही समोर जाणारा कंटेनरला मागून जोरात धडकली. यामध्ये एकजण ठार तर एकजण जखमी झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये इनोव्हा गाडीचा चक्काचूर झाला. मारुती बलभिम कोराडकर असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर संतोष अंकुश सावंत हे जखमी झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com