पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारी अमुल्या आहे तरी कोण?; वडील म्हणतात, 'चुकीला माफी नाही'

टीम ई-सकाळ
Friday, 21 February 2020

कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणारी अमुल्या जयनगरमधील एका बड्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. डिसेंबर 2019पासून बेंगळुरूमध्ये सुरू झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधातील आंदोलनातून अमुल्या प्रकाशझोतात आलीय.

बेंगळुरू (Karnataka): बेंगळुरूमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आयोजित रॅलीमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. अर्थात एका माथेफिरू मुलीनं हे कृत्य केलं. स्टेजवर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी उपस्थित होते. त्यांनी त्या मुलीला अडवण्याचा प्रयत्न केला. पण, तिची घोषणा बाजी थांबत नसल्याचे पाहून पोलिसांनीच तिला स्टेजवरून खाली नेलं. अमुल्या लिओना नोरोन्हा, असं तिचं नाव असून, तिच्यावर आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोण आहे अमुल्या?
अमुल्या ही मूळची चिक्कमंगळुरू जिल्ह्यातील कोप्पाची रहिवासी आहे. कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणारी अमुल्या जयनगरमधील एका बड्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. डिसेंबर 2019पासून बेंगळुरूमध्ये सुरू झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधातील आंदोलनातून अमुल्या प्रकाशझोतात आलीय. अशा प्रत्येक आंदोलनात अमुल्या उपस्थित असते. सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अमुल्या अॅक्टिव असते. बेंगळुरूतील प्रत्येक आंदोलनात तिला सहज माईक दिला जातो. अगदी त्याच पद्धतीनं अमुल्याला कालच्या आंदोलनात माईक मिळाला. पण, घडलं काही वेगळच. जगातील प्रत्येक देश जिंदाबाद आहे आणि रहावा, असं अमुल्याचं मत आहे. तिनं हे मत व्यक्त करताना, अमुल्यानं सुरुवातच पाकिस्तान जिंदाबादनं केली. त्यामुळं तिला तिचं म्हणणचं मांडता आलं नाही.

आणखी वाचा - केंद्रीय मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमुल्याची फेसबुक पोस्ट, व्हायरल व्हिडिओ 
अमुल्या कायमच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. गेल्या आठवड्यात 16 फेब्रुवारी रोजी तिनं फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्यात तिनं भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश सगळे देश जिंदाबाद असल्याचं म्हटलं होतं. हेच म्हणणं घेऊन ती व्यासपीठावर बोलायला उभी राहिली होती. पण, तिनं सुरुवात पाकिस्तान जिंदाबाद अशी केल्यानं तिला स्टेजवरून खाली उतरवण्यात आलं. पोलिसांनी तिच्यावर काल रात्रीच देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तिची संपूर्ण चौकशी करण्यात आली. आज तिला सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयानं तिला 14 दिवसांची न्यायालयी कोठडी सुनावली आहे. येत्या सोमवारी तिच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वडिल म्हणतात, 'चुकीला माफी नाही'
अमुल्याच्या या कृत्यावर तिच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडील म्हणाले, 'आम्ही तिला अशा प्रकारच्या घोषणाबाजी आणि कृत्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. मी तिच्या वतीने संपूर्ण देशाची माफी मागतो. तिला कोणताही कायद्याचा सपोर्ट मी करणार नाही. तिला कायदा कळू दे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bangalore amulya leona noronha information marathi