खोपोली नजीक द्रुतगतीवर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

accident
accident

लोणावळा, ता.१६:  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली नजीक फुडमॉल समोर भरधाव कंटेनरने चार वाहनांना मागून ठोकरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये एकाच परिवारातील पाच वर्षांच्या चिमुकलीसह चौघांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी (ता.१५) मध्यरात्री साडेबारा  वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 

श्रीमती मंजू प्रकाश नायर, (वय- ५८, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम), डॉ. वैभव वसंत झुंझारे, (वय-४१), उषा वसंत झुंझारे, (वय- ६३), वैशाली वैभव झुंझारे, (वय- ३८), श्रिया वैभव झुंझारे, (वय-५, सर्व रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, नवी मुंबई मनपा, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. 
जखमींमध्ये सोनाजी कांबळे (वय-३०), प्रकाश हेमराज नाहर (वय-६५, दोघे रा. गोरेगाव पश्चिम), अर्णव वैभव झुंझारे (वय-११), किशन चौधरी व काळूराम जमनाजी जाट यांचा समावेश आहे.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात किलोमीटर क्र.३६ जवळ तीव्र उतारावर भरधाव कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो पुढे जाणाऱ्या टेम्पोला जोरात धडकला. यामध्ये टेम्पो मार्गावर उलटला.   याचदरम्यान पाठीमागून येणाऱ्या दोन मोटारी  टेम्पोवर आदळल्या जोरात धडकल्या. याचदरम्यान अन्य एक वाहन या मोटारींवर आढळल्याने मोटारींचा चक्काचूर झाला.  
या अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमावरुन परतताना हा अपघात झाला. तर अन्य दोन मोटारी सोबत होत्या.  मुबंईकडे परतताना घाटात दोन मोटारी पुढे निघून गेल्या आणि या दोन कारचा अपघात झाला. अपघाताची माहिती कळताच खोपोली पोलीस, महामार्ग पोलीस, आयआरबी कंपनीचे देवदूत पथक घटनास्थळी होत मदतकार्य सुरू केले. अपघातातील दोन जखमींना पनवेल येथील अष्टविनायक  आणि अन्य दोघांना वाशी येथे मनपा रुग्णालयात आणि एकाला इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com