पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू: Accident on Pune Nagar Highway 2 died | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Accident : पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

पुण्यात एकीकडे पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पुण्यातील पुणे-नगर महामार्गावर चालकांचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो आणि पिकअपची धडक झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेल्हे गावाजवळ हा अपघात झाला आहे.

या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर जखमींमध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे नगर महामार्गावर बेल्हे गावाजवळ झालेल्या अपघातात एक महिला आणि एक पुरुषाचा मृत्यू झाला आहे. पहाटेच्या सुमारास चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो आणि पिकअप गाडी यांची समोरासमोर धडकली.

टॅग्स :accident case