
भोर : भोर-महाड मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे भोर-निगुडघर-हिर्डोशी मार्गावर अपघाताचा धोका कायम आहे. संबंधित कामाचे ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी वाहनचालकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यामुळे धोका वाढत असल्याचे नागरिक आणि वाहनचालकांचे म्हणणे आहे.