Pune News : बाणेर येथे बांधकामावरून सळईचा गट्टू डोक्यात पडून मुलाचा अपघाती मृत्यु

बांधकाम व्यावसायिक, साईट इंजिनियर, तसेच बांधकामावरील कामगार यांच्यावर चतु:र्श्रुंगी पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
accidental death of worker boy after iron road fell on his head from construction site baner
accidental death of worker boy after iron road fell on his head from construction site banerSakal

बालेवाडी : बाणेर येथील गणराज चौक जवळ ' केतन वीरा' बांधकाम व्यावसायिकाचे' बांधकाम सूरु असताना रूद्र राऊत (वय -९ ) या लहान मुलाच्या डोक्यात बिल्डिंग वरून सळईचा गट्टू पडून अपघात झाला व यात त्याचा मृत्यु झाला.

संबंधित बांधकाम व्यावसायिक, साईट इंजिनियर, तसेच बांधकामावरील कामगार यांच्यावर चतु:र्श्रुंगी पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाणेर येथे गणराज चौका जवळ बाणेर महाळूंगे मुख्य रस्त्यालगत' केतन वीरा ' या बांधकाम व्यावसायिकाचे बांधकाम सुरू आहे. ( ता. २२ नोव्हेंबर ) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान या बिल्डिंगच्या पहाडाचे काम सुरू असताना या इमारती वरून सळईचा गट्टू मुख्य रस्त्यावर पडला.

जवळच असणाऱ्या ' द ऑर्किड स्कूल 'या शाळेमध्ये शिकत असणारा रुद्र केतन राऊत (वय-९) रा. विरभद्र नगर बाणेर, हा तिथून जात असताना त्याच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला, जुपिटर हॉस्पिटल मध्ये उपचार करताना उपचारा दरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. संबंधित बांधकाम व्यावसायिक व साईट इंजिनियर, बांधकामावरील कामगार यांच्यावर चतु:र्श्रुंगी पोलीस चौकीत गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली.

एका बांधकाम व्यावसायिकाच्या हलगर्जी पणापुळे एका निष्पाप लहान मुलाचा बळी गेल्याने परीसरात नागरीक हळहळ व्यक्त करीत आहेत. तसेच ही इमारत अगदी पदपथाला लागूनच असुन या इमारतीच्या बांधकामास परवानगी कशी दिली गेली? याबाबत नागरीक आपआपसात चर्चा करत आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com