'मुकद्दर' पुस्तकाचे लेखक स्वप्नील कोलते यांचा अपघाती मृत्यू

'मुकद्दर' पुस्तकाचे लेखक स्वप्नील कोलते यांचा अपघाती मृत्यू

उरुळी कांचन (पुणे) : मराठ्यांच्या पराक्रमाची शौयगाथा अर्थात "मुकद्दर" या नावाचे पुस्तक लिहणाऱ्या, स्वप्नील रामदास कोलते (वय 33, रा. कोरेगाव मुळ ता. हवेली) या हुरहुन्नरी तरुणाचा मंगळवारी (ता. 26) रात्री साडेअकरा वाजण्याच्या  सुमारास अपघाती मृत्यू झाला. इतिसकालीन व्यक्तींच्या जिवनाचा अभ्यास करण्याचा छंद असणाऱ्या स्वप्नील यांच्या अपघाती मृत्यूमुळे कोरेगाव मुळसह पुर्व हवेलीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत स्वप्नील कोलते मंगळवारी रात्री शिरुरहून घरी परतत असताना, पुणे-सोलापूर महामार्गावर इनामदारवस्तीजवळ स्वप्नील यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने वरील अपघात घडला. या प्रकरणी स्वप्नीलचा चुलत भाऊ बाबासाहेब मधुकर कोलते यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत स्वप्नील कोलते यांचा एका मोबाईल कंपनीचा वितरणाचा व्यवसाय होता. यासाठी स्वप्नील यांचे पुणे व शिरुर तालुक्यात ये-जा होती. दरम्यान मंगळवारी मोबाईल फोनच्या वितरणाचे काम संपवून, घऱाकडे परतत असताना इनामदारवस्तीजवळ त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. यात स्वप्नील यांना गंभीर स्वरुपाचा मार लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्वप्नीलच्या पश्चात आई, पत्नी व एक मुलगा, एक मुलगी असा परीवार आहे. 

सिंकदर पुस्तक गाजले... 
इतिसकालीन व्यक्तींच्या जिवनाचा अभ्यास करण्याचा छंद असणाऱ्या स्वप्नील यांनी काही दिवसांपुर्वी मराठा साम्राज्यातील विविध सरदार मंडळींच्या जिवनावर "मराठ्यांच्या पराक्रमाची शौयगाथा" अर्थात "मुकद्दर" या नावाचे पुस्तक लिहले होते. या पुस्तकामुळे स्वप्निल कोरेगाव मुळसह पुर्व  हवेलीमधील युवा वर्गात चांगलाच फेमस होता. "सिंकदर" या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने स्वप्नील यांनी माजी केंद्रिय कृषीमंत्री शऱद पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची नुकतीच भेट घेऊऩ, पुस्तकांच्या प्रती भेट दिल्या होत्या.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com