बाणेर रस्त्यावर होऊ शकतो अपघात; चेंबरला मोठे भगदाड

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

शिवाजीनगर कडून मुंबई-बंगलोर महामार्गाकडे जात असताना रस्त्यावरील हॉटेल भैरवी समोर एकच चेंबरचे सिमेंटचे झाकण पुर्णपणे फुटले असुन इथे मोठा खड्डा निर्माण झाला आहे.

बालेवाडी : बाणेर मुख्य रस्त्यावर हॉटेल भैरवी समोर असणाऱ्या चेंबरचे झाकण पूर्ण फुटले असून याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे चेंबर त्वरित दुरुस्त करण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत.  

शिवाजीनगर कडून मुंबई-बंगलोर महामार्गाकडे जात असताना रस्त्यावरील हॉटेल भैरवी समोर एकच चेंबरचे सिमेंटचे झाकण पुर्णपणे फुटले असुन इथे मोठा खड्डा निर्माण झाला आहे. हे चेंबर बरोबर रस्त्यावर असल्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. हे फुटलेले चेंबर लक्षात यावे यासाठी नागरिकांनी त्यात नारळाच्या झावळ्या टाकल्या  आहेत काही फरशीचे तुकडेही टाकले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाणेर रस्ता हा अतिशय रहदारीचा रस्ता असून सतत वाहतूक कोंडीचा सामना याठिकाणी नागरिकांना करावा लागतो. रात्रीच्या वेळी किंवा पहाटे  तुटलेले चेंबर लक्षात न आल्यामुळे याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता असून, एखाद्याच्या जीवावर बेतू शकते तरी हे चेंबर दुरुस्त त्वरित दुरुस्त करण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत. 

''याठिकाणी या चेंबरचे झाकण त्वरित बसवण्यात येईल.''
- संदीप चाबुकस्वार,  कनिष्ठ अभियंता पथ विभाग

''हा रस्ता खूप रहदारीचा असुन अपघात होण्यापूर्वी हे चेंबर त्वरित दुरुस्त करण्यात यावे.''
-विश्वास कळमकर, बाणेर रहिवासी

"मी इथला भाई आहे' अशी धमकी देत मागितली खंडणी  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidents can occur due to large whole in the chamber on Baner Road