
शिरूर : नगर परिषदेच्या सुमारे तीस ते चाळीस लाख रूपये किंमतीच्या भंगाराची परस्पर विल्हेवाट, फूटपाथ व पूररेषेतील अतिक्रमणे, घनकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासनाने येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सहआयुक्त (नगर पालिका प्रशासन) व्यंकटेश दुर्वास यांनी शिरूर नगर परिषदेस दिले असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद व शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.