IITM and ARIES Sign MoU
sakal
पुणे - देशातील हवामान बदलाचे दीर्घकालीन आणि अचूक निरीक्षण करण्यास आता मदत होणार असून, हवामानविषयक संशोधन, भविष्यकालीन हवामान अंदाज आणि धोरणनिर्मितीसाठी अधिक विश्वासार्ह माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था’ (आयआयटीएम), पुणे आणि ‘आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्व्हेशनल सायन्सेस’ (एआरआयईएस) यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत भारत हवामान निरीक्षण जाळे (बीकॉन) प्रकल्पाचा भाग म्हणून उत्तराखंडमधील देवस्थळ येथे अत्याधुनिक हवामान निरीक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.