
सोशल मिडीयावर नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची बदनामी केल्याप्रकरणी आकाश नंदू नवले या युवकावर अॅट्राेसिटी दाखल करुन शिक्रापूर पोलिसांनी त्याला कोतूळ (जि. नगर) येथून अटक केली.
शिक्रापूर : सोशल मिडीयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची बदनामी केलेला आकाश नंदू नवले या युवकावर अॅट्रोसिटी दाखल करुन शिक्रापूर पोलिसांनी त्याला कोतूळ (ता. अकोले, जि. नगर) येथून अटक केली. दरम्यान त्याला शिरुर न्यायलायाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ रानगट यांनी दिली.
'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल
आकाश नंदू नवले (वय २५, रा.जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर) असे नाव असलेल्या युवकाने अॅड. प्रकाश आंबेडकर यांची सोशल मिडीयावर बदनामी केल्याने त्यांचेवर शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली होती. याच अनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी राहूल धस व पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दोन पथके तयार केली व ती नवले याच्या शोधार्थ पाठविली. यातील एका पथकाला आरोपी नवले हा कोतुळ (ता.अकोले, जि. नगर) येथे मिळून आला. त्याला शिरुर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी नवनाथ रानगट यांनी दिली.
अनावश्यक वादात चंद्रकांत पाटील यांना ओढणं चुकीचं!
दरम्यान समाजकारण, धार्मिक, ऐतिहासिक आणि राजकारणातील कुणाही व्यक्तीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावर कुणी टाकल्यास त्या सहन केल्या जाणार नाहीत. अशा कुठल्याही तक्रारींबाबत आपण गंभीर असून शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व सोशल मिडीयावर सक्रीय असणारांनी सजग राहण्याचे आवाहन यावेळी पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी केले.
(संपादन : सागर डी. शेलार)