esakal | आरोपीचा पोलीस ठाण्यातच किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

बोलून बातमी शोधा

Accused attempted suicide by drinking pesticide at police station}

बऱ्याच वेळ होऊनही आरोपी आला नाही, म्हणून पोलिसांनी शोध घेतल्यानंतर तो शौचालयात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीस तातडीने पुणे येथे उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविले.

आरोपीचा पोलीस ठाण्यातच किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आळेफाटा : चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका आरोपीने आळेफाटा येथील पोलीस ठाण्यात  कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न  केल्याची घटना नुकतीच घडली असुन, या आरोपीस पोलीसांनी उपचारासाठी पुणे येथे ससून रुग्णालयात दाखल केले आहे. 

याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आळेफाटा पोलीसांनी म्हसवंडी (ता.संगमनेर,जि. अहमदनगर) येथील एका तरूणाला ताब्यात घेतल्यानंतर, त्या आरोपीने शौचास लागली म्हणून बहाणा करीत आळेफाटा पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या शौचालयात कीटकनाशक औषध पाशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

बऱ्याच वेळ होऊनही आरोपी आला नाही, म्हणून पोलिसांनी शोध घेतल्यानंतर तो शौचालयात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीस तातडीने पुणे येथे उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविले. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी सांगीतले की, एका गुन्ह्यातील आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, आपल्यावर गुन्हा दाखल झाला या भितीपोटी त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलीस निगराणीत उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.