Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

आपल्या मैत्रिणीशी बोलत असल्याच्या संशयावरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका २८ वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करून मोटारीतून अपहरण केल्याचा प्रकार पुणे शहरात घडला.
youth kidnapping

youth kidnapping

Sakal

Updated on

पुणे - आपल्या मैत्रिणीशी बोलत असल्याच्या संशयावरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका २८ वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करून मोटारीतून अपहरण केल्याचा प्रकार सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलिस चौकीच्या परिसरात मध्यरात्री घडला. पोलिसांनी शहरात नाकाबंदी करत सिंहगड रस्त्यावर तरुणाची सुखरूप सुटका करत दोघांना अटक केली. न्यायालयाने दोघा आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com