Pune | शिक्रापूर दरोडा व खून प्रकरणातील आरोपी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्रापूर दरोडा व खून प्रकरणातील आरोपी जेरबंद
शिक्रापूर दरोडा व खून प्रकरणातील आरोपी जेरबंद

शिक्रापूर दरोडा व खून प्रकरणातील आरोपी जेरबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाघोली - शिक्रापूर येथील दरोडा व खून प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला पकडण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील हे आरोपी पेरणे फाटा परिसरात ट्रान्सफॉर्मर चोरीचा प्रयत्न करीत असताना पोलीसानी त्यांना पकडले.

दिनेश कुंदन पवार ( वय 25, रा. तळेगाव ढमढेरे ) व शिवा नाना जगताप ( वय 40, रा दौंड ) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

पवार हा दरोडा व खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. लोणीकंद पोलिसानी दिलेल्या माहिती नुसार, पोलीस ट्रान्सफॉर्मर चोरीचा तपास करत होते. पोलीस कर्मचारी बाळासाहेब सकाटे यांना पेरणेफाटा परिसरात दोघे जण ट्रान्सफॉर्मर चोरीचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार यांना सांगितले. पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पाच ट्रान्सफॉर्मर चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या कडून सुमारे दोन लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. हा माल विकत घेणाऱा व्यापारी विराम दिपाराम चौधरी ( वय 50, रा शिक्रापूर ) याला ही ताब्यात घेतले.

हेही वाचा: ‘एटीएमएस’च्या बहान्याने काँग्रेसचा राष्ट्रवादीवर निशाणा

पवार याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने शिक्रापूर येथे दरोडा टाकून खून केल्याची कबुली दिली. 1 मे 2021 ला शिक्रापूर परिसरातील जमदाडे मळा परिसरातील तुळसाबाई शिंदे यांच्या घरी पवार याने चार साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकून शकुंतला शिंदे यांचा खून केला होता. ही कामगिरी पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निखिल पवार, उपनिरीक्षक सुरज गोरे, बाळासाहेब सकाटे, समीर पिलाने, मोहन वाळके, विनायक साळवे, कैलास साळुंखे, अजीत फरांदे, बाळासाहेब तनपुरे, पांडुरंग माने, सागर शेडगे यांनी ही कामगिरी केली.

loading image
go to top