Court
sakal
वेल्हे, (पुणे) - अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात वेल्हे (ता.राजगड)पोलिसांनी केलेल्या तपासाला मोठे यश आले आहे. या आरोपीला शिवाजीनगर पुणे येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने पॉक्सो कायद्यान्वये दोषी ठरवत २० वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड सुनावला आहे. दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार आहे.