गर्दी बघायला आले अन्‌ पोलिसांना सापडले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 October 2019

दहिटणे (ता. दौंड) हद्दीत मुळामुठा नदीपात्रालगत रविवारी (ता. १३) ट्रकचालक नितीन शिवाजी दरेकर (रा. आष्टी, जि. बीड) यास तिघांनी मारहाण करून सुमारे एकवीस हजार रुपयांचा ऐवज लुटला. यापैकी विजय सुभाष दोरगे व सचिन दत्तात्रय चव्हाण (दोघे रा. दहिटणे) हे नाट्यमयरीत्या पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून तिसरा आरोपी अमित शांताराम चव्हाण (रा. दहिटणे) याचेही नाव समोर आले.

यवत/राहू - दहिटणे (ता. दौंड) हद्दीत मुळामुठा नदीपात्रालगत रविवारी (ता. १३) ट्रकचालक नितीन शिवाजी दरेकर (रा. आष्टी, जि. बीड) यास तिघांनी मारहाण करून सुमारे एकवीस हजार रुपयांचा ऐवज लुटला. यापैकी विजय सुभाष दोरगे व सचिन दत्तात्रय चव्हाण (दोघे रा. दहिटणे) हे नाट्यमयरीत्या पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून तिसरा आरोपी अमित शांताराम चव्हाण (रा. दहिटणे) याचेही नाव समोर आले.

फिर्यादी ट्रकचालक हंडाळवाडी (ता. दौंड) येथील दादासाहेब आनंदा हाके यांच्या ट्रकवर चालक म्हणून काम करतात. तालुक्‍यातील विविध गुऱ्हाळांवरील गुळाची गुजरात येथे वाहतूक या ट्रकद्वारे केली जाते. रविवारी दुपारी चालक दरेकर ट्रक घेऊन दहिटणे येथे गूळ भरण्यासाठी जात होते. त्या वेळी हे तिघे दोन दुचाकींवर तेथे आले. त्यांनी दुचाकी आडव्या लावून ट्रकच्या पुढच्या चाकांमधील हवा सोडली. त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न करताच त्यांनी चालक दरेकर यांना मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल व घड्याळ असा मिळून सुमारे एकवीस हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. चालक दरेकर यांनी सोबत असलेल्या हमालाच्या फोनवरून मालक हाके यांना फोन करून घडला प्रकार सांगितला. हाके यांनी यवत पोलिस ठाण्यात येऊन घटनेची माहिती दिली. पोलिस हवालदार दत्तात्रेय खाडे सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी गेले. तेथे घडल्या प्रकाराची माहिती घेताना गर्दी जमली. ही गर्दी कशासाठी जमली हे पाहण्यासाठी विजय दोरगे व सचिन चव्हाण तेथे आले. ते समोर येताच चालक दरेकर यांनी त्यांना ओळखले व त्याबाबत पोलिसांना सांगितले. आयतेच समोर आलेले सावज पोलिसांनी अलगद आपल्या जाळ्यात घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accused were arrested in daund

Tags
टॉपिकस
Topic Tags: