esakal | Video : चांदणी चौक येथे अॅसिड गळती; नागरिकांना डोळे चुरचुरण्याचा त्रास!
sakal

बोलून बातमी शोधा

Acid_Tanker-Pune

टँकरमधून गॅस गळती होत असून लोक बेशुध्द पडू लागले आहेत, अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडियाद्वारे सगळीकडे पसरल्या होत्या. 

Video : चांदणी चौक येथे अॅसिड गळती; नागरिकांना डोळे चुरचुरण्याचा त्रास!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरूड (पुणे) : चांदणी चौक येथे अॅसिड घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून गळती झाल्याची घटना घडली आहे. यामुळे कोथरूडमधील भुसारी काॅलनी परिसरातील नागरिकांना डोळे चुरचुरने, डोळ्यातून पाणी येणे यांसारखा त्रास होऊ लागला. रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडल्याचे स्थानिक रहिवाशांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना कळविले आहे.

- बारावीच्या विद्यार्थ्यांनो, पुस्तकांची विक्री झाली सुरू; ऑनलाइनही ऑर्डर करता येणार!

येथे अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने आल्या. माती टाकून वासाची आणि अॅसिडची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांनी केला. पोलिसांनी तत्काळ रस्ता बंद करून वाहतूक रोखल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही.

- हिंजवडी पोलिसांच्या 'त्या' मेसेजमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये परसली घबराट 

मुंबई येथून निघालेला हा टँकर (एम.एच. 46 बी.एम.3659) नीरा-बारामतीकडे चालला होता, असे टँकर चालकाने पोलिसांना सांगितले. 

दरम्यान, टँकरमधून गॅस गळती होत असून लोक बेशुध्द पडू लागले आहेत, अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडियाद्वारे सगळीकडे पसरल्या होत्या. मात्र, याबाबत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

- शाळा सुरु झाल्यावर मुलांचे कसे होणार? पालकांनो, चिंता करु नका कारण...

कोथरूड पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी सांगितले की, ''परिस्थिती नियंत्रणात आहे. अॅसिड सदृश्य पदार्थांची गळती झाली आहे. मात्र, कोणीही बेशुध्द पडल्याची तक्रार वा माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही. सुरक्षेसाठी रस्त्यावरील वाहतूक रोखली आहे. लोकांच्या डोळ्यांतून पाणी येणे, चुरचुरणे असा त्रास लोकांना होत होता.''

अॅसिड गळती झाल्याने काही लोकांना डोळ्यातून पाणी येणे, डोळे चुरचुरण्याचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे कोथरूडकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अशा अॅसिड गळती झालेल्या टँकरची तपासणी करत अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला वेळीच आवर घातल्याने त्याचा फैलाव आणखी होऊ शकला नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा