शाळा सुरु झाल्यावर मुलांचे कसे होणार? पालकांनो, चिंता करु नका कारण....

ब्रिजमोहन पाटील
Wednesday, 27 May 2020

- शाळा सुरू झाल्यावर वागायचे कसे ?
- संस्थांनी घेतला पुढाकार
- मुलांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न

पुणे : राज्याचे शिक्षण विभाग शाळा सुरू करण्याचे नियोजन करत आहे, पण सहाजिकपणे पालकांना भिती आहे ती आपले मुल शाळेत गेल्यावर त्याला काही झाले तर कसे होणार?. याचाच विचार करून पुण्यातील चार संस्थांनी एकत्र येऊन 'कोरोना'पर्वात शाळेत कसे वागायचे, काळजी कशी घ्यायची याचे गेल्या महिनाभरापासून विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षण दिले जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी आणि महर्षी कर्वे शिक्षण संस्था या चार संस्थांनी 'पुणेकर अगेंस्ट कोरोना' हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक या सर्वांचा समावेश आहे. त्यामध्ये वर्ग शिक्षकास त्यांच्या वर्गाची जबाबदारी देण्यात आली. पालकांना फोन करून सहकुटुंब यात सहभागी होण्याचे आवाहन केले. आतापर्यंत ४ संस्थांच्या पुण्यासह सांगली, सातारा, वाई, सोलापूर  चिपळूण, पनवेल येथे असल्याने असे एकूण १५७ शाळांमधील सुमारे ८० हजार विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी झाले आहेत. 

रेल्वेच्या जागेवरील झोपडीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; मध्य रेल्वेने 'एसआरए' दिल्या 'या' सुचना

"पालकांना वाॅट्सअॅप ग्रुपवर आज काय करायचे आहे याचा व्हिडिओ किंवा मेसेज पाठवतात. कधी कधी व्हिडिओ काॅल करून शिक्षक मुलांशी गप्पा मारतात, त्यांनी काय काय केले आहे ते पहातात. रोज किमान तीन तास मुले विविध कामात व्यस्त अाहेत." असे बाल शिक्षण मंदिरच्या प्राचार्या गितांजली बोधनकर यांनी सांगितले. 

ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक यांच्यावर आता 'ही' जबाबदारी: विभागीय आयुक्त यांचे निर्देश

उपक्रमाचा उद्देश
- लाॅकडाऊनमुळे घरात कोंडले गेलेल्या मुलांना कंटाळा न येता विविध गोष्टी करून घेणे. 
- सकारात्मक विचार वाढीस लावणे
- मास्क, सॅनिटाइजर वापरण्याची व वैयक्तिक स्वच्छतेची सवय लागणे 
- सोशल डिस्टन्स म्हणजे काय?, ते कसे राखले पाहिजे हे कुटूंबाला समजने
- प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्राणायाम, योगासने, सूर्यनमस्कार करणे, 
- आयुष मंत्रालयाने सुचविलेली औषधे घेऊन 'कोरोना'चा प्रतिबंध करणे

 Big Breaking : पुणे विद्यापीठ चाैकातील ते दोन पूल पाडण्याबाबत झाला मोठा निर्णय
"या उपक्रमात सध्या चार संस्था आहेत, पुण्यातील इतर मोठ्या संस्थांनीही यामध्ये सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांना जागृत करावे यासाठी संबंधित संस्थांच्या पदाधिकार्यांशी चर्चा सुरू आहे. कोरोना विरोधातील लढ्यात मानसिक व शारीरिक दृष्ट्या मुलांना सक्षम करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. 
- महेश आठवले, उपाध्यक्ष, 'डीईएस'

दिलीप बंड म्हणतात, विद्यापीठ रस्त्यावरील तीनही पूल पाडणे योग्यच

"कोरोना'वर औषध नसल्याने अशा स्थितीत विद्यार्थ्यांनी  कशी काळजी घ्यावी यासाठी चार संस्थांनी एकत्र येऊन 'पुणेकर अगेंस्ट कोरोना हा उपक्रम सुरू केला. जेव्हा प्रत्यक्षात शाळा सुरू होईल तेव्हा कसे लागले पाहिजे, काय काळजी घ्यावी याचे धडे विद्यार्थ्यांना व कुटुंबीयांना उपक्रमातून मिळाले आहेत."
- सुधीर गाडे, सह सचिव, एमईएस 

ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक यांच्यावर आता 'ही' जबाबदारी: विभागीय आयुक्त यांचे निर्देश

"शाळेने राबविलेल्या उपक्रमामुळे मुले स्वच्छता पाळत आहेत, हात धुवत आहेत. घरात मास्क तयार केले, कामात मदत करत आहेत. त्यामुळे ते लाॅकडाऊनमध्ये कंटाळले नाहीत व शाळेत जाताना कशी काळजी घ्यावी त्यांना कळाले आहे."
- मुग्धा भागवत, पालक

हिंजवडी पोलिसांच्या 'त्या' मेसेजमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये परसली घबराट

उपक्रमाचा तक्ता
संस्था -      शाळांची संख्या- सहभागी विद्यार्थी
एमईएस          -   ७५ -                  -   २५,०००
महर्षी कर्वे      -     ६४                    -  २५, ०००
शिप्र मंडळी    -    १०                     -   २०,०००
डीईएस          -     ८                      -   १०,०००
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: initiative about behaviour when school starts after lockdown