'एल्गार'च्या तपासासाठी 'या' पोलिस अधिकाऱ्याला केंद्रीय गृहमंत्रालयाचं पदक

Dr_Shivaji_Pawar
Dr_Shivaji_Pawar

पुणे : एल्गार परिषद आणि माओवादी संबंध प्रकरणाच्या तपासाबद्दल गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पदक जाहीर करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट तपासासाठी देण्यात येणाऱ्या पदकासाठी देशभरातील १२१ पोलिस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील दहा पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपास कौशल्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून तपास अधिकाऱ्यांना पोलिस पदक देऊन गौरविण्यात येते. डॉ.  पवार सध्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत सहायक पोलिस आयुक्तपदी नेमणुकीस आहेत. एल्गार परिषद प्रकरणाचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com