सासवडमध्ये ४७१ वाहनचालकांवर कारवाई; पोलिसांनी `एवढा` दंड केला वसूल

दत्ता भोंगळे
Monday, 1 June 2020

४७१ लोकांवर कारवाई करण्यात आली. यामधून ९९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर गेल्या महिन्यामध्ये सासवड पोलिसांनी ३२७२ केसेस दाखल केल्या त्यातून ७, ४६, ००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

गराडे (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची वर्दळ थांबावी म्हणून पोलिसांकडून अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

पुण्यातील `या` भागात अवैध व्यावसायिक जोमात

३१ मे रोजी सासवड आणि परिसरामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४७१ वाहनचालकांवर वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून त्यांच्याकडून ९९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडून संचारबंदीची  कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती.

 
यामध्ये श्रीनाथ चौक, दिवेघाट, हिवरे रोड फाटा, नारळी बाग या विविध पॉईंटवर वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ४७१ लोकांवर कारवाई करण्यात आली. यामधून ९९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर गेल्या महिन्यामध्ये सासवड पोलिसांनी ३२७२ केसेस दाखल केल्या त्यातून ७, ४६, ००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, सासवड पोलिस स्टेशन ट्रॅफिक पोलीस नाइक ज्योतिबा भोसले यांनी उत्तम कामगिरी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सासवड परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करावे. अत्यावश्यक गरज असेल तरच घराचे बाहेर पडावे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, पोलीस अधीक्षक बारामती विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी भोर पुरंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, पोलीस शिपाई रमेश कर्चे, निलेश जाधव, दत्ता जाधव, कैलास सरक, कानतोडे, जाधव, कुंभार, पोलीस शिपाई तसेच होमगार्ड व ट्रॅफिक वॉर्डन यांची यांनी सहभाग घेतला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against 471 drivers in Saswad