पुण्यातील `या` भागात अवैध व्यावसायिक जोमात...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

हवेली पोलिसांकडून या व्यावसायिकांवर वारंवार कारवाई करण्यात येते. मात्र, ते व्यवसाय करण्याचे थांबवत नसल्याने पोलिस यंत्रणाही हतबल झाली आहे.

किरकटवाडी (पुणे) : हवेली उपविभागातील विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू, ताडी व गांजा विक्रीच्या व्यावसायाला उधाण आले आहे. त्यामुळे ३० जणांना तडीपार करण्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, महिना होत आला तरी त्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही. 

पुणेकरांनो लॉकाडाउन वाढला; पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन शक्य आहे!

हवेली पोलिसांकडून या व्यावसायिकांवर वारंवार कारवाई करण्यात येते. मात्र, ते व्यवसाय करण्याचे थांबवत नसल्याने पोलिस यंत्रणाही हतबल झाली आहे. त्यामुळे हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील यांनी या व्यावसायिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्याची मागणी उपविभागीय दंडाधिकारी सचिन बारवकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तर कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनाच क्वारंटाइन करण्यासाठी जागा अपुरी पडत असताना या अवैध व्यावसायिकांना क्वारंटाइन करण्याची व्यवस्था करायची कशी? असा प्रश्न अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

प्रशासनाच्या या गोंधळामध्ये अवैध व्यावसायिक मात्र मोकाट फिरत आहेत. ताडी, दारू व गांजा खरेदीसाठी शहराच्या विविध प्रतिबंधित भागातून हवेली परिसरात नागरिक ये-जा करत असल्याने संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will action be taken against illegal traders in the haveli